Magel Tyala Solar Pump : सोलरचा पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला? पेमेंट करावे कि नाही ?

Magel Tyala Solar Pump: मागेल त्याला सोलर पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येतात. काही शेतकऱ्यांनी या योजनेत पैसे भरलेले असतात आणि त्यांचा अर्ज पात्रतेसाठी सबमिट झालेला असतो. मात्र, ज्यांनी अजून पेमेंट केलेले नाही, त्यांना पेमेंट करण्यासंदर्भात मेसेज पाठवले जातात.

Magel Tyala Solar Pump: जर तुम्हाला सोलर पंप योजनेअंतर्गत मेसेज आला असेल, तर दिलेल्या नियमानुसार तुम्हाला तातडीने पैसे भरावे लागतील. हे केल्यावरच तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी स्वीकारला जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 7 महिन्यांत किती निधीचे वितरण? विधिमंडळातून माहिती समोर
Magel Tyala Solar Pump : सोलरचा पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला? पेमेंट करावे कि नाही ?

पेमेंट पर्याय आला का नाही असे तपासा?

सोलर पंप योजनेसाठी अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा:

  1. सर्वप्रथम संकेतस्थळाला भेट द्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
  2. मुख्यपृष्ठावरील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पर्यायावर क्लिक करा.
  3. उघडलेल्या पानावर लाभार्थी सुविधा (Beneficiary Services) वर क्लिक करा.
  4. यानंतर अर्जाची सद्यस्थिती (Application Status) या पर्यायावर क्लिक करा.
  5. Search by Beneficiary ID या पर्यायासमोरील रकान्यात आपला प्राथमिक नोंदणी क्रमांक टाका.
  6. Search बटणावर क्लिक करा.
  7. पुढील विंडोमध्ये तुमची अर्जासंबंधीची सर्व माहिती दिसेल.
  8. अर्ज Draft स्थितीत असल्यास, पेमेंट बाकी असल्याचे दिसेल.
  9. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा
  10. Proceed Payment या बटणावर क्लिक करा.
  11. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट स्थितीत येईल.

सौर ऊर्जेचे महत्व ओळखून महाराष्ट्र शासनाने सन २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी विविध सौर कृषीपंप योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अटल सौर कृषीपंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना (Magel Tyala Solar Pump Yojana) यांचा समावेश होता. सद्यस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजना अंतर्गत राज्यात सौर कृषीपंप स्थापन करण्यात येत आहेत.

Magel Tyala Solar Pump Yojana

राज्यात ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांना झालेला फायदा आणि त्यांचा चांगला प्रतिसाद पाहता, शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.

Farmer Identity Card
Farmer Identity Card: शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजना 19 वा हप्ता रक्कम मिळणार नाही!

पेमेंट प्रक्रिया

या योजनेअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. पात्र अर्जदारांसाठी आता पेमेंट ऑप्शन देखील सुरू करण्यात आला आहे. पेमेंटसाठी खालीलप्रमाणे रक्कम भरावी लागेल:

  • 3 एचपी साठी: ₹22,971/-
  • 5 एचपी साठी: ₹32,075/-
  • 7.5 एचपी साठी: माहिती उपलब्ध नाही.

महत्वाची सूचना

पेमेंट करण्यापूर्वी अर्जदारांनी आपला अर्ज पूर्ण आहे याची खात्री करावी. अर्ज पूर्ण (मंजूर) मानला जाईल जर:

Construction Worker
Construction Worker : बांधकाम कामगारांसाठी मोठी सुवर्णसंधी ! आता मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान – त्वरित अर्ज करा!
  1. सातबारा उताऱ्यावर विहीर/बोअरवेलची नोंद असेल.
  2. योग्य प्रकारची कागदपत्रे (प्रमाणपत्र) अपलोड केलेली असतील.
  3. सामायिक पाण्याच्या स्त्रोतासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अपलोड केले असेल.

टीप:

  • अपूर्ण अर्ज असलेल्या अर्जदारांनी पेमेंट करू नये.
  • पेमेंट केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल.
  • त्रुटी आढळल्यास परतावा मिळण्यास बराच वेळ लागू शकतो.
हे पण वाचा : Pm kisan mandhan yojana: जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी मासिक ₹3000 पेन्शन देणारी केंद्र सरकारची योजना

1 thought on “Magel Tyala Solar Pump : सोलरचा पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला? पेमेंट करावे कि नाही ?”

Leave a Comment