Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी लाभदायक ठरली आहे. योजनेचा लाभ 2 कोटी 40 लाख महिलांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, अर्जांबाबत छाननी होणार की नाही, यावर चर्चा सुरू आहे. माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ( Aditi Tatkare ) यांनी यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश
- महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे.
- गरीब व मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत पोहोचवणे.
- प्रत्येक महिलेला दरमहा ठराविक आर्थिक मदत देणे.
अर्जांची छाननी होणार का?
योजनेच्या अर्जांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत.
- तक्रारींचे मुद्दे :
- 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा समावेश.
- घरात चारचाकी वाहन असलेल्याही लाभ घेत असल्याचे दिसून आले.
Aditi Tatkare: यावर आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
- तक्रारी आल्यासच अर्जांची छाननी होईल.
- तक्रारींच्या आधारेच संबंधित विभाग निर्णय घेईल.
- त्यांच्या कार्यकाळात अशा तक्रारी आल्या नव्हत्या.
योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील काही बदल सूचवले आहेत.
- सध्याचे निकष:
- अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ.
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक.
- एका घरात दोन महिलांपेक्षा जास्त लाभ घेऊ शकत नाहीत.
३५ ते ५० लाख बहिणी अपात्र ठरणार?
- महायुती सरकारच्या शपथविधी सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण योजना’ कायम राहील. आर्थिक नियोजनानंतर महिलांना मासिक 2100 रुपये हप्ता दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
- महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन लक्षात घेता, योजनेत सुधारणा करण्याचा विचार सुरु आहे. परंतु काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी सुरु झाली आहे.
- 2 कोटी 34 लाख लाभार्थींमधून अंदाजे 15-20 टक्के महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते. याचा अर्थ, 35 ते 50 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- सरकारने योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द केले जातील. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
छाननीनंतर काही महिलांचे अर्ज निकषांमुळे बाद होऊ शकतात.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच ठेवली जाईल. लाभार्थींना दरमहा 2,100 रुपये देण्याचा निर्णय बजेटच्या वेळी विचाराधीन असेल. मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या आर्थिक स्त्रोतांचा विचार करून पडताळणी केली जाईल. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. यासाठी लागणाऱ्या व्यवस्थांची उभारणी केली जाईल.”
तसेच, “जर कोणी निकषाच्या बाहेर जाऊन लाडकी बहिण योजनेचा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. काही तक्रारी समोर आल्या आहेत, त्यानुसार निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले. योजनेतील पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांची निवड सुनिश्चित करण्यासाठी सरकार पुढे ठोस पावले उचलेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी संधी
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी योजना महत्त्वाची ठरते.
- तक्रारी असल्यास तपास होईल.
- निकषांचे पालन करून योजना सुरळीत सुरू राहील.
विशेष मुद्दे | तपशील |
---|---|
लाभार्थ्यांची संख्या | 2 कोटी 40 लाख महिला |
निकषाबाहेर अर्जांची संख्या | 15% ते 20% |
मासिक मदत | 1,500 ते 2,100 रुपये |
मुख्य तक्रारी | उत्पन्न व चारचाकी वाहनाचा मुद्दा |
तुम्ही केलेल्या लाडकी बहिण योजनाच्या अर्जाची स्थिती तुम्ही खालील लिंक वर तपासू शकता.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : या महिलांचे अर्ज होणार रद्द तर या महिलांवर होणार गुन्हे दाखल