Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा पुढचा हप्ता कधी मिळणार

Ladki Bahin Yojana 6th Installment: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana) महत्त्वाचा निर्णायक ठरल्याचे निवडणुकीच्या परिणामावरून स्पष्ट झाले आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात ही योजना मांडली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला होता.

निवडणुकीच्या आधीच्या काळात या योजनेअंतर्गत पाच हप्ते, म्हणजेच ७,५०० रुपये, पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान आणि आशा निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केले की, सत्तेत पुनरागमन झाल्यास या योजनेतील मासिक रकमेत वाढ केली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 7 महिन्यांत किती निधीचे वितरण? विधिमंडळातून माहिती समोर

महायुतीला यशस्वी बहुमत मिळाले आहे (२८८ पैकी २३५ जागा), आणि लवकरच सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. शिवाय, या हप्त्यात १,५०० रुपये मिळणार की नव्या जाहीरनाम्यानुसार २,१०० रुपये मिळतील, याबाबत उत्सुकता आहे. Ladki Bahin Yojana Yojana 6Th Installment

Ladki Bahin Yojana Yojana 6Th Installment

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य केले असून, पुढील हप्त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या अपेक्षा उंचावल्या असून सरकारच्या पुढील घोषणेकडे त्यांचे लक्ष आहे.

महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू करत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्याची तरतूद केली होती. या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची रक्कम वाढवण्याचे संकेत दिले होते. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली आहे. योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना आता 1500 रुपये नव्हे तर 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय होणार आहे.

Farmer Identity Card
Farmer Identity Card: शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजना 19 वा हप्ता रक्कम मिळणार नाही!

डिसेंबरमध्ये होईल का रकम जमा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही रक्कम डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारीत, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. अर्ज केलेल्या महिलांनाच लाभ दिला जाणार का सर्वांसाठी ही योजना खुली राहणार, यावरही स्पष्टता अजून मिळालेली नाही.

त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. संबंधित लाभार्थ्यांची नावे, वितरणाची प्रक्रिया, आणि निधी हस्तांतराच्या तारखा याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही प्रतीक्षेत आहे.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Update: नवीन तपासणी प्रक्रिया व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Construction Worker
Construction Worker : बांधकाम कामगारांसाठी मोठी सुवर्णसंधी ! आता मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान – त्वरित अर्ज करा!

Leave a Comment