Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 7 महिन्यांत किती निधीचे वितरण? विधिमंडळातून माहिती समोर

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत जून २०२४ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत सात महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे.

सात महिन्यांत निधीचे वितरण

Ladki Bahin Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात मांडला. या अहवालानुसार, जून ते डिसेंबर या कालावधीत २ कोटी ३८ लाख लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

Farmer Identity Card
Farmer Identity Card: शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजना 19 वा हप्ता रक्कम मिळणार नाही!

  • निधीचे एकूण वितरण:१७,५०५ कोटी रुपये
  • मासिक मदत:१५०० प्रति महिना

२१०० रुपये वाढीव रक्कम होणार लागू?

महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे, महिलांना लाडकी बहीण योजनेतून आता दरमहा ₹ २१०० रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लेक लाडकी योजनेत मोठी वाढ | Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या लेक लाडकी योजना हीसुद्धा महिलांच्या कल्याणासाठी महत्त्वाची ठरत आहे.

Construction Worker
Construction Worker : बांधकाम कामगारांसाठी मोठी सुवर्णसंधी ! आता मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान – त्वरित अर्ज करा!
  • सन २०२३-२४ मध्ये लाभार्थी: २८८९ महिलांना७ कोटी ७९ लाखांचे वितरण
  • सन २०२४-२५ मध्ये लाभार्थी: १ लाख ४ हजार महिलांना५२ कोटी रुपये वाटप

माझी कन्या भाग्यश्री योजनेतही वाढ

महिला सशक्तीकरणासाठी राबविलेल्या या योजनेतही निधीवाढ झाली आहे.

  • सन २०२३-२४ मध्ये निधी:६ कोटी ७८ लाख
  • सन २०२४-२५ मध्ये निधी:१३ कोटी २० लाख

Crop Insurance Application : पीक विमा अर्जाची स्थिती कशी तपासायची? पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का? 2 मिनिटांत तपासा!

महिला सशक्तीकरणात महत्त्वाची भूमिका

या योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरत आहेत. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. आगामी अर्थसंकल्पात वाढीव निधी जाहीर होताच योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Manodhairya Yojana
Manodhairya Yojana : पीडित महिला व बालकांसाठी सुधारित मनोधैर्य योजने अंतर्गत 10 लाख रुपये

Leave a Comment