PAN 2.0 Apply Online: केंद्र सरकारने जुन्या पॅन कार्डच्या जागी PAN 2.0 नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केला आहे. यामुळे जुने पॅन कार्ड वैध राहणार असले, तरी नव्या पॅन कार्डमध्ये आधुनिक QR कोड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. हे कार्ड तुम्हाला पूर्णतः विनामूल्य ईमेलद्वारे मिळविता येईल. मात्र, फिजिकल कार्डसाठी थोडेसे शुल्क भरावे लागेल. चला तर मग, या कार्डसाठी आवश्यक प्रक्रिया समजून घेऊया. PAN 2.0 Apply Online
ईमेलवर ई-पॅन कार्ड विनामूल्य कसे मिळवायचे?
तुमच्या ईमेलवर ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, फिजिकल कार्ड हवे असल्यास अर्जदाराने ₹५० शुल्क भरावे लागेल. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना टपाल शुल्कासह ₹१५ अधिक भरावे लागतील. PAN 2.0 project अद्याप पूर्णतः कार्यरत नसला, तरी ईमेलवर पॅन मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जर तुमच्या आयकर खात्यात ईमेल आयडी अद्याप नोंदणीकृत नसेल, तर तुम्ही PAN 2.0 project द्वारे ईमेल अपडेट करून पॅन मिळवू शकता. यासाठी खालील प्रक्रिया अवलंबा:
PAN 2.0 Apply Online ऑनलाइन अर्जाची पद्धत
१. वेबसाईटला भेट द्या:
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या लिंकवर क्लिक करा.
२. माहिती प्रविष्ट करा:
पॅन नंबर, आधार क्रमांक (केवळ व्यक्तींसाठी), आणि जन्मतारीख टाका.
३. सहमत व्हा आणि सबमिट करा:
आवश्यक तपशील भरून बॉक्सवर टिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
४. माहिती पडताळणी:
नवीन वेबपेज उघडेल. तुम्ही दिलेली माहिती आयकर विभागाच्या डेटाबेसमध्ये अद्यतनित आहे की नाही, हे तपासा.
५. OTP पडताळणी:
वन-टाईम पासवर्ड (OTP) निवडा, जो फक्त १० मिनिटे वैध असेल.
६. देयक प्रक्रिया:
सोईचा पेमेंट पर्याय निवडा आणि Proceed to Payment वर क्लिक करा.
७. पेमेंट यशस्वी:
रक्कम अदा केल्यानंतर, ‘Pay Confirm’ बटणावर क्लिक करा.
८. ई-पॅन वितरण:
पेमेंटनंतर, तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ई-पॅन कार्ड ३० मिनिटांत वितरित होईल.
समस्या आल्यास काय कराल?
PAN 2.0 Apply Online: जर तुमच्या ईमेलवर पॅन वेळेत मिळाले नाही, तर तुम्ही खालील पर्याय निवडू शकता:
- ईमेल पाठवा:
तुमचे पेमेंट तपशीलसह tininfo@proteantech.in वर ईमेल पाठवा. - संपर्क क्रमांक:
ग्राहक सेवा क्रमांक 020 – 27218080 किंवा 020 – 27218081 वर कॉल करा.
टीप: फक्त काही सोप्या टप्प्यांमध्ये तुम्हाला नवीन पॅन कार्ड विनामूल्य मिळविता येईल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.
हे पण वाचा: PAN 2.0 Project: जुने पॅनकार्ड होणार बंद ! आता क्यूआर कोडसह नवीन पॅनकार्ड येणार; जाणून घ्या सविस्तर माहिती