Agriculture Drone Subsidy : शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणीसाठी ड्रोन मिळणार, ऑनलाइन अर्ज कसा करावा

Agriculture Drone Subsidy: कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत २०२४-२५ साठी राज्य शासनाने कृषी ड्रोन खरेदीसाठी अर्थसाह्याचा वार्षिक आराखडा मंजूर केला आहे. या योजनेतून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, तसेच कृषी पदवीधर लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ घेता येईल. Agriculture Drone Subsidy

ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीतील महत्त्वपूर्ण वापर

कृषी क्षेत्रात ड्रोन म्हणजेच मानवविरहित वायू यंत्रणा महत्त्वाची ठरत आहे. विविध पिकांवर कीटकनाशके, विद्राव्य खते, तसेच सूक्ष्म मूलद्रव्ये फवारणीसाठी ड्रोन वापर उपयुक्त आहे. वेळ, श्रम, व खर्च वाचवत ड्रोन रोजगार निर्मितीस चालना देतो.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 7 महिन्यांत किती निधीचे वितरण? विधिमंडळातून माहिती समोर

कोणते लाभ मिळतील?

लाभार्थ्यांचे वर्ग व अनुदानाचे प्रमाण

लाभार्थी वर्गअनुदानाचे प्रमाणकमाल रक्कम (रुपये)
शेतकरी उत्पादक कंपनी४०%४,००,०००
कृषी पदवीधर५०%५,००,०००
महिला, अनुसूचित जाती/जमातीचे शेतकरी५०%५,००,०००
सर्वसाधारण शेतकरी४०%४,००,०००

अनुदान कसे ठरते?

किसान ड्रोन आणि जोडणाऱ्या साहित्याची मूळ किंमत किंवा अनुदान मर्यादा, त्यातील कमी किंमत ग्राह्य धरली जाईल.

Crop Insurance Application
Crop Insurance Application : पीक विमा अर्जाची स्थिती कशी तपासायची? पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का? 2 मिनिटांत तपासा!

कृषी ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे

  • वेळ वाचतो: फवारणीसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
  • श्रम वाचतो: मानवी श्रम कमी होऊन परिणामकारकता वाढते.
  • उत्पन्न वाढवते: आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.

ऑनलाइन अर्ज कसा करावा | Agriculture Drone Subsidy Apply online

  1. ऑनलाइन अर्ज:
    लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल येथे अर्ज सादर करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
  2. शेतकरी पोर्टल लोगिन केल्या नंतर अर्ज करा हा पर्याय निवडा.
  3. त्या नंतर कृषी यांत्रिकीकरण घटक मधील भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र येथील खालील दिलेल्या फोटो मधील स्टेप वापरा.
Agriculture Drone Subsidy Apply online
Agriculture Drone Subsidy Apply online
  1. संपर्क साधा:
    अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

निष्कर्ष

कृषी ड्रोन अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करते. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन वाढू शकते. ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

Farmer Identity Card
Farmer Identity Card: शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजना 19 वा हप्ता रक्कम मिळणार नाही!

Leave a Comment